मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्लीपर्यंत नेऊ, शिवसेनेचा पंतप्रधान व्हायलाच हवा- संजय राऊत

0
313

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्लीपर्यंत घेऊन जायचंय. आपला पंतप्रधान व्हायला हवा, असं शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत विक्रोळीत एका उद्यानाच्या कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

मगाशी पगड्या घालण्यात आल्या, पण पुणेरी पगडी वेगळी असते. पेशव्यांची पगडी वेगळी आहे. ही पगडी म्हणजे संकेत आहे. बाजीराव पेशव्यांनी दिल्लीपर्यंत आपलं साम्राज्य नेलं होतं. तसेच उद्धव ठाकरे यांना दिल्लीपर्यंत घेऊन जायचं. आपला पंतप्रधान व्हायला हवा., असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, पुढील लढाई मुंबई महापालिका निवडणुकीची आहे. महापालिकेत शिवसेनेचा भगवा उतरवू असं ज्यांनी आव्हान दिलं आहे. त्यांच्या छाताडावर उभे राहून भगवा फडकवून दाखवू, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी-

“परळ ब्रँड शिवसैनिक गेला; माजी खासदार मोहन रावले यांचं निधन”

“अजित पवारांना जे काही मिळालंय ते केवळ शरद पवारांमुळेच, त्यावर त्यांनी स्वत:चं लेबल लावू नये”

“अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण”

“भाजपचा ‘हा’ मोठा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here