“नितेश राणेंचा कणकवलीत पराभव करून शिवसेना काय चीज आहे हे दाखवून देऊ”

0
172

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदावर भाजपचा अध्यक्ष विराजमान झाल्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका केली होती.

वैभव नाईक हे आमच्याशी आयुष्यात कधीच स्पर्धा करू शकत नाहीत. सिंधुदुर्गात राणेंना आव्हान देणारा किंवा धक्का देणा-याला 10 जन्म घ्यावे लागतील, असं नितेश राणे म्हणाले होते. त्यांच्या टीकेला वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नितेश राणेंचा कणकवलीत पराभव करून शिवसेना काय चीज आहे हे दाखवून देऊ, असा हल्लाबोल वैभव नाईक यांनी केला आहे. नारायण राणेंचं आव्हान आम्ही कधीच संपवलं. वैभव नाईक एक व्यक्ती म्हणून नाही तर सामान्य शिवसैनिक म्हणून राणेंना आव्हान देऊन 2014 च्या निवडणुकीत राणेंसारख्या माजी मुख्यमंत्र्याचा पराभव केला तर गेल्या निवडणूकीत माझ्या मुळेच नारायण राणेंनी पळ काढला, अशी जोरदार टीका वैभव नाईक यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री आणि मोदींपेक्षाही मोठे नेते, पण ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत- संजय राऊत

IPL 2021 च्या आधी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; कर्णधार श्रेयस अय्यर IPL मधून बाहेर?

चाैकशी लावा, “दूध का दूध, पानी का पानी” होऊन जाऊ दे- अनिल देशमुख

केंद्राच्या नावाने बोटे मोडणार्‍यांनी ‘हे’ आवर्जून वाचलं पाहिजे; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here