मुंबई पोलिसांना त्यांच्या मर्जीनुसार काम करू द्या, राजकारण करू नका- दिलीप वळसे पाटील

0
511

मुंबई : दिल्लीत काल पकडण्यात आलेल्या 6 दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याचं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच या दहशतवाद्यांकडून मुंबई लोकलची रेकी करण्यात आली असल्याची देखील माहिती समजत आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

पोलीस अतिशय योग्य पद्धतीनं संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून त्यांना त्यांच्या पद्धतीनं काम करू दिलं पाहिजे, यात राजकारण करण्याची काहीच गरज नाही, असं वळसे पाटील म्हणाले.

दरम्यान, पोलिसांना चौकशीबाबत संपूर्ण स्वातंत्र्य असून ते त्यांच्या पद्धतीनं तपास करत आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीनं काम करु द्यायला पाहिजे. उगाच कुणी राजकारण करण्याची गरज नाही, असंही वळसे पाटील यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपने किरीट सोमय्यांना ईडीचं प्रवक्तेपद द्यावं; रोहित पवारांचा टोला

सांगलीमध्ये खाजगी कार्यालयात लसीकरण न केलेला स्टाफ आढळून आल्यास कार्यालये सील करणार- नितीन कापडणीस

“उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची”

“राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता उदयनराजेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here