आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : बीडमधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या भावंडांमध्ये चांगलीच जुंपली आहे. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव न घेता केली. यावर प्रत्युत्तर दिलं होतं.
खासदार प्रीतम मुंडे यांनी तुमच्याच नाकर्तेपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली असल्याची टीका केली आहे. त्यावर भाऊ धनंजय मुंडे यांनी बहीण प्रीतम मुंडे यांना प्रत्युत्तर देत, कर्ते-नाकर्तेपणाची चर्चा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या, असं आव्हान दिलंय.
हे ही वाचा : “निलेश राणे म्हणजे शिवसेनेनं जन्माला घातलेलं पिल्लू, ते आम्हांला काय शिकवणार”
मी धनंजय मुंडे म्हणून काम करत नसेल तर धनंजय मुंडेंला वाट्टेल तसं बदनाम करा. मात्र बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. बीड जिल्हा बिहार झालाय, बीड जिल्ह्याला मागास म्हणून माझ्या जिल्ह्याची बदनामी करू नका, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
चौकशीनंतर देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले…
राज्यभर आंदोलन करून भाजप राजकीय भांडवल करत आहे; काँग्रेस नेत्याची टीका
दुसरा व्हिडिओ बाॅम्ब उद्या-परवा येतोय; चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा