Home महाराष्ट्र “कोरोनाचं संकट लवकर दूर होऊ दे; मुख्यमंत्र्यांची गणरायाच्या चरणी प्रार्थना”

“कोरोनाचं संकट लवकर दूर होऊ दे; मुख्यमंत्र्यांची गणरायाच्या चरणी प्रार्थना”

मुंबई : आजपासून श्री गणरायाचं आगमन होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री व पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्याला संबोधित केलं.

जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो, अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर, जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं अगदी परदेशात देखील श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा मनोभावे केली जाते. सलग दुसऱ्या वर्षी देखील आपण कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतोय, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

दरम्यान, एरव्ही गणेशोत्सव म्हटला की, गर्दी आणि धुमधडाक्यातला जल्लोष असं चित्र असायचं. मात्र 2 वर्षांपासून कोरोनाने आपल्या पायात बेड्या अडकवल्या आहेत. कितीही मनात असलं तरी आपल्याला काही गोष्टींवर बंधनं आणावी लागत आहेत. शेवटी उत्सवापेक्षा लोकांच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देणे हे सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“मोदी देश विकण्यासाठी सत्तेत बसले आहेत, त्यामुळे 2024 ला काँग्रेस पूर्ण ताकदीने लढणार”

“गुलाबराव पाटील यांनी घेतली गिरीश महाजन यांची भेट, चर्चांना उधाण”

“India Vs England 5th Test! पाचव्या कसोटी सामन्यावर कोरोनाचं सावट, दोन्ही बोर्डांच्या संमतीने सामना रद्द”

प्रशांत किशोर यांच्या मदतीची मला कोणतीच गरज नाही- शरद पवार