मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. यावरच अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून नाराजी व्यक्त केली आहे.
माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्याचं मला काही वाटत नाही. पण माझ्या बहिणींच्या मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. केवळ अजित पवारांच्या नातलग म्हणून धाडी टाकल्या असतील तर ते योग्य नाही, असा संताप अजित पवारांनी यावेळी केला. ते माध्यमांशी बोलत होते.
माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली याबद्दल मला काही म्हणायचं नाही. मी पण एक नागरिक आहे. मला एका गोष्टीचं दु:ख आहे, ज्यांची 35-40 वर्षांपूर्वी लग्न झाली, त्यांचा चांगल्या पद्धतीने संसार सुरु आहे. त्या तीन बहिणींवर, कोल्हापूरच्या आणि पुण्यातील दोन बहिणींवर धाडी टाकल्या. त्याचं कारण मला माहिती नाही. ते व्यवस्थित आपलं जीवन जगत आहेत. त्यांच्या मुलांची-मुलींची लग्न झाली आहेत, नातवंडं आहेत. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने याचा जरुर विचार करावा, कोणत्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो, हे पाहावं, असं अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“11 ऑक्टोबरला महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारलाय, लाज वाटली पाहिजे ठाकरे सरकारला”
लखीमपूर हिंसेवरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठीच साखर कारखान्यांवर धाडी- जयंत पाटील
“मनसेची मोठी खेळी; राष्ट्रवादीत गेलेल्या ‘या’ नेत्याचा पुन्हा मनसेत प्रवेश”
निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाकडून छापे; अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…