“कुछ मीठा हो जाये, सांगलीत जयंत पाटलांनी सदाभाऊ खोतांना भरवली कॅटबरी, चर्चांना उधाण”

0
368

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करणारे माजी मंत्री सदाभाऊ खोत  यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी कॅटबरी भरवल्याने ‘कुछ मिठा हो जाए’ च्या चर्चांनी सांगलीत जोर धरला आहे.

काल पालकमंत्री जयंत पाटील आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत हे कट्टर विरोधक काल सांगलीच्या इस्लामपूर नगरपालिकेच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते. तिथं भरसभेत एका चिमुकलीने जयंत पाटील यांना कॅटबरी दिली. त्यावेळी जयंत पाटलांनी ती कॅटबरी लगेच सदाभाऊ खोत यांना दिल्याने उपस्थितांमध्ये सर्वांना हसू आवरलं नाही.

हे ही वाचा : “विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरेंची निवड झाल्यापासून शिवतीर्थवर उत्साह; कार्यकर्त्यांसोबतचे फोटो व्हायरल”

दरम्यान, इस्लामपूर नगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र, पंपिंग स्टेशन व ड्रेनेज नेटवर्क कामाचा शुभारंभ काल मंत्री पाटील, आमदार खोत आणि खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना जयंत पाटलांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला. ‘तुम्ही तिकडे वरती राहता, आम्हाला जेवायला केव्हा बोलावताय..जेवण राहु द्या, किमान चहा-पाण्याला बोलवा.. आम्ही येताना सोबत खासदारांना आणतो, कारण मागच्यावेळी तुम्ही त्यांचा प्रचार केला होता’, असं म्हणताच उपस्थितांमध्ये सर्वांना हशा पिकला.

महत्वाच्या घडामोडी –

“सोमय्यांना कोर्टाचा पहिला दणका; नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला”

मी, मनसेच्या सगळ्या शाखांंना अन् मंत्र्यांना शिवरायांच्या संदेशाची पाटी पाठवणार- राज ठाकरे

“युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी आता शरद पवार उतरले मैदानात; दिल्या ‘या’ सूचना”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here