पावसाचे कारण देऊन मैदान सोडलं, आणि…; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

0
322

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे आध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार होती. त्याच सभेच्या नियोजनासाठी आणि मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीसाठी राज ठाकरे 2 दिवसीय पुणे दौऱ्यावर होते. मात्र पावसाच्या शक्यतेने त्यांनी आपली सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यावरुन शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.

पावसाचे कारण देऊन मैदान सोडले भोंग्याचे कारण देऊन देशपांडे पळाले अयोध्याचे कंत्राट अर्धेच मिळाले. मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामु मिळाले, असं दिपाली सय्यद म्हणाल्या.

हे ही वाचा : “भाजपची मोठी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ” 

दरम्यान, पुढच्या आठवड्यात इनडोअर सभा घेण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे. स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंच इथे राज ठाकरे यांची सभा होण्याची शक्यता आहे. तशी माहिती मनसे नेते बाबू वागजकर आणि किशोर शिंदे यांनी दिली आहे.

 महत्वाच्या घडामोडी –

वसंत मोरेंना भेटीची वेळ दिली, पण न भेटताच राज ठाकरे मुंबईकडे रवाना

“मोठी बातमी! संभाजीराजे भोसले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल; चर्चांना उधाण”

“मनसेत सुसाट पक्षप्रवेश; राज ठाकरेंच्या भोंग्याच्या निर्णयावरून अनेक मुस्लिम युवकांचा मनसेत प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here