“बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचाच भाग आहे; कर्नाटकच्या उपमुख्यमंंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

0
434

बेळगाव : मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही, तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचाच भाग आहे. मुंबईवर आमचा हक्क आहे, असं म्हणत लक्ष्मण सवदी यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, मुंबई प्रदेश केंद्रशासित करा अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं लक्ष्मण सवदी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“दिल्लीतील हिंसा सुनियोजित त्याला अमित शहा जबाबदार, त्यांचा राजीनामा घ्या”

गिरीश बापट यांचा स्वभाव काँग्रेससारखा- अजित पवार

…तर झेपत नाही म्हणून जाहीर करा; अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यावर टीका

“हरलो म्हणून खचून जायचं नाही हे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनं दाखवून दिलं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here