पायातली ‘कोल्हापूरी चप्पल’ हातातही घ्यायला शिका; राजू शेट्टींचा शेतकऱ्यांना सल्ला

0
299

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

उस्मानाबाद : कोल्हापुरची माणसं नुसतंच कोल्हापुरी पायतन घालत नाहीत. तर वेळप्रसंग पडला तर हातात सुध्दा घेतात म्हणून त्यांना न्याय मिळतो. त्यामुळे लढायला शिका, रडत बसू नका, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

हे ही वाचा : भाजपकडून दंगलीचं राजकारण सुरू, जनतेनं भाजपच्या षडयंत्राला बळी पडू नये- नाना पटोले

लक्षात ठेवा म्हणून तुम्ही पायात हातात घ्यायला शिका काटा मोडतो म्हणूनच पायात घालायचं नाही. कधी कधी पायतनाचा उपयोग दुसऱ्या कारणासाठी सुध्दा करायचा असतो, तो नाही केला तर तुम्हाला आयुष्यात न्याय मिळणार नाही., असं राजू शेट्टी म्हणाले. लोहारा तालुक्यातील माकणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाभिमानी संघटनेच्या वतीने ऊस व सोयाबीन परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी ते बोलत होते

दरम्यान, तुमचे कारखानदार 7-8 महीने ऊसाचे पैसे देत नाही. हे दुर्दैव आहे. कायदा काय सांगतो ऊस तोडणीनंतर 14 दिवसांच्या आत सरकारने जो बांधून दिलेला हमी भाव आहे. त्याप्रमाणे विना कपात एक रक्कमी रक्कम दिली पाहीजे. नाही दिले तर त्याला 15 टक्के व्याजाची आकारणी करुन पैसे शेतकऱ्यांना द्यावे. पण हे कारखानदार वेळेवर पैसे देत नाहीत. तुम्ही गप्प का बसता आवाज उठवा, असं आवाहनही राजू शेट्टींनी यावेळी शेतकऱ्यांना केलं.

महत्वाच्या घडामोडी –

एसटी संप; सह्याद्री अतिथीगृहावरील बैठक संपली; अनिल परबांनी बैठकीबाबत दिली माहिती; म्हणाले…

…तरच भाजप-मनसे युती शक्य; रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य

महापालिका निवडणुकीत शिवसेनेला धूळ चारणार; भाजपाच्या ‘या’ मोठ्या नेत्याने फुंकलं रणशिंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here