मुंबई : राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र, त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. यामुळे महाविकास आघाडीतील नेते आक्रमक झाले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडीतील नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे. यावेळी बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळदेखील यावेळी उपस्थित होते.
जो प्रस्ताव आम्ही दिला होता त्यासंबधी राज्यपालांना पुन्हा पत्र दिलं आहे. राज्य मंत्रिमंडळाने दुसऱ्यांदा ठराव करुन जो प्रस्ताव दिला आहे तो मान्य करावा अशी विनंती राज्यपालांना करण्यात आली आहे, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
उत्तर प्रदेशातील साधू हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांना फोन; म्हणाले…
लॉकडाउन हळूहळू शिथिल झालं पाहिजे- सुप्रिया सुळे
उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र मोठा भाऊ म्हणून पाहतोय- सुप्रिया सुळे
किशोरीताई यांनी आपल्या समोर खरा आदर्श निर्माण केला- धनंजय मुंडे