मुंबई : महाविकास आघाडी सरकारने विधानसभेतील विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. महाआघाडीची सत्ता आल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले नेते परत येण्याच्या तयारीत आहेत, असा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.
भाजप पुन्हा सत्तेत येणार या आशेवर अनेक दिग्गजांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश केले. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. त्यामुळे भाजपत गेलेल्या नेत्यांना परतीचं वेध लागल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
आम्हाला फोडाफोडीचं राजकारण करायचं नाही. आम्ही फोडोफोडीचं राजकारण केलं तर भाजप पूर्ण रिकामं होईल, असं म्हणत नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला.
दरम्यान, भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांनमध्ये नेमके कोणते नेते आहेत. याची राजकिय वर्तूळाात चर्चा सूरु झाली आहे.