आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : विश्वचषकाच्या 33 व्या सामन्यात टीम इंडियाच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकन फलंदाजांची दाणादाण उडाली.
टीम इंडियाने तब्बल 302 धावांनी श्रीलंकेवर विजय मिळवत सेमी फायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा केला.
ही बातमी पण वाचा : …तर परिणाम भोगावे लागतील – मनोज जरांगे
श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. भारताने प्रथम फलंदाजी करताना, निर्धारित 50 षटकात 8 विकेट गमावत 357 धावांचा डोंगर उभा केला. टीम इंडियाकडून शुभमन गिल 92 चेंडूत 11 चाैकार, 2 षटकारांसह 92, विराट कोहली 94 चेंडूत 11 चाैकारांसह 88 धावा, आणि श्रेयस अय्यरने 56 चेंडूत 3 चाैकार, 6 षटकारांसह 82 धावांची खेळी केली. तर श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने 5 विकेट्स घेतल्या, तर दुशमंथा चमिराने 1 विकेट घेतली.
दरम्यान, धावसंख्येचा पाठलाग करताना, श्रीलंकन संघ 19.4 षटकात 55 धावांवर कोलमडला. श्रीलंकेकडून कसून रजिताने सर्वाधिक 14 धावा, महिश तीक्षणाने नाबाद 12, तर अँजेलो मॅथ्यूजने 12 धावा केल्या, तर श्रीलंकेच्या 5 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. भारताकडून मोहम्मह शमीने सर्वाधिक 5, मोहम्मह सिराजने 3, तर जसप्रित बुमरा व रवींद्र जडेजाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या घडामोडी –
‘कुणबी म्हणून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही’ – एकनाथ शिंदे
मोठी बातमी! बीडच्या घटनेत थेट नेत्यांचा हात?; फडणवीसांचा खळबळजनक दावा
पुण्यातील नवले ब्रीजवर आंदोलकांचं टायर जाळून रस्ता रोको