Home पुणे पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; अजित पवारांचा शब्द

पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; अजित पवारांचा शब्द

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत पुण्याचा कोरोना संसर्ग आटोक्यात आला पाहिजे त्यासाठी प्रशासनाने झटून काम करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

पुण्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निधीची कमतरता भासू दिली नाही, यापुढेही निधीची कमतरता भासणार नाही, असा शब्द अजित पवार यांनी दिला आहे. विधानभवन सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण भागात नियंत्रण मिळवा तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेत काम करा, गणेश मंडळाचे कार्यकर्ते तसेच सामाजिक संस्थांना सोबत घेत पुण्याला कोरोनामुक्त करूया, अशी आशा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसात आपण सर्व मिळून कोरोनावर निश्चितपणे मात करू, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजपने राजकारण करू नये”

तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब प्रकरण; नवनीत राणांनी व्यक्त केला संताप

राज्यात सरकार स्थापनेबाबत चंद्रकांत पाटलांनी केला नवा खुलासा; म्हणाले…

खासगी प्रयोगशाळांनी रुग्णांना कोरोना पॉझिटिव्ह अहवाल परस्पर देऊ नये- उद्धव ठाकरे