‘क्या हुवा तेरा वादा जयंतराव जी’, जयंत पाटलांचा व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

0
453

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील 6 वर्षानंतर दारूबंदी उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

चित्रा वाघ यांनी याबाबत ट्विट केलं आहे. जयंत पाटलांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये विधानसभेत यवतमाळच्या दारूबंदीवर जयंत पाटील बोलताना दिसत आहेत.

क्या हुवा तेरा वादा जयंतराव जी सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळला दारूबंदी करणार. इस आश्वासन का?, यवतमाळ राहिलं दूर, चंद्रपुरची दारूबंदी उठवली तुमच्या सरकारने महिलांना कमी समजू नका अजूनही आमच्या भावनांशी असचं खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चुल फुंकायची वेळ येईल, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं.

महत्वाच्या घडामोडी –

“ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द हे भाजपचे पाप, फडणवीसांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा”

अनिल देशमुख, अनिल परब यांच्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांचा नंबर- किरीट सोमय्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव- गोपीचंद पडळकर

मराठा समाज तसाही अजित पवारांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here