सांगली : पाटबंधारे विभागाच्या नियोजनाप्रमाणे सांगली कृष्णानदी पाणी पातळी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. पाणी उतारास विलंब लागत असला तरी सोमवारी सकाळी पाणी पातळी दोन फुटाने कमी होऊन 52 वर तर सायंकाळपर्यंत 47 फुटावर पोहोचेल असा विश्वास पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता लालासाहेब मोरे यांनी बोलताना व्यक्त केला.
समाज माध्यमावर पसरणाऱ्या अफवेवर विश्वास ठेवू नका. कराडला 24 फूट पाणी उतरले आहे. सांगली जिल्ह्यात बहे 16 आणि ताकारी दहा फूट उतरले आहे. भिलवडीमध्ये 12 तासात केवळ दोन फुटांनी उतरलेले आहे. तसेच सांगलीत सात तासानंतर 1 इंच उतरले. हे महापूर अनुभवलेल्या जनतेलाही नवीन नाही, असं लालासाहेब मोरे यांनी सांगितलं आहे.
सोमवारी सायंकाळपर्यंत 6 ते 7 फूट पाणी निश्चितच कमी होऊन 47 फुटावर सांगलीची पाणी पातळी पोहोचेल. राधा नगरी धरणाचे पाणी जरी सुरू झाले तरीही ते पोहोचायला उद्याचा दिवस लागेल तोपर्यंत सांगलीचे पाणी उतरलेले असेल. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता शासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही उपविभागीय अभियंता लालासाहेब मोरे यांनी यावेळी केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
कृष्णेची पातळी कमी होत आहे, कुणीही घाबरून जाऊ नये, लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल- जयंत पाटील
सांगलीकराना दिलासा; कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरण्यास सुरवात
मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही म्हणणाऱ्या नारायण राणेंना आदित्य ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले…