आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अहमदाबाद : आज भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 44 धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली.
वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने टाॅस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 विकेट गमावत 237 धावा केल्या. भारताकडून सुर्यकुमार यादवने सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. तर के.एल.राहुलने 49 धावांची महत्तपूर्ण खेळी केली. तर वेस्ट इंडिजकडून अल्जारी जोसेफ व ओडीयन स्मिथने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
हे ही वाचा : संजय राऊत तुमची जागा आता “आत”, त्यामुळे धमक्या देणं बंद करा; नारायण राणेंचा हल्लाबोल
दरम्यान, धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 46 षटकात 193 धावांवर संपुष्टात आला. वेस्ट इंडिजकडून शामारह ब्रुक्सने सर्वाधिक 44 धावा केल्या, तर अकिल हुसेनने 34 धावा केल्या. तर भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 4, शार्दुल ठाकूरने 2 तर मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, वाॅशिंग्टन सुंदर, दीपक हुडाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी –
“अमरावतीचे पालिका आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांच्यावर रवी राणा समर्थकांनी फेकली शाई”
संजय राऊत म्हणाले, मुंबईचा दादा शिवसेनाच; आता देवेंद्र फडणवीस, म्हणतात…
कर्नाटक सरकारचा हिजाबला परवानगी देण्यास नकार; तर ओवेसी म्हणतात…