आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
आयपीएलचा आजच्या कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या रंगतदार सामन्यात कोलकाताने दिल्लीचा शेवटच्या षटकात 3 विकेट्स राखून पराभव केला.
दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 विकेट गमावत केवळ 135 धावा केल्या. दिल्लीकडून शिखर धवनने 39 चेंडूत 36 धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने 27 चेंडूत 30 धावांची खेळी केली. कोलकाताकडून वरूण चक्रवर्तीने 2 विकेट्स घेतल्या, तर लाैकी फर्ग्युसन व शिवम मावीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
हे ही वाचा- “माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तब्येतीत बिघाड; रूग्णालयात केलं दाखल”
धावांचा पाठलाग करताना कोलकाताने आक्रमक सुरूवात केली. वेंकटेश अय्यर व शुभमन गिलने 96 धावांची आक्रमक खेळी केली. मात्र अय्यर बाद होताच कोलकाता संघाच्या विकेट्स ठरावीक अंतराने बाद होत गेल्या. शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी 7 धावांचा गरज होती. अश्विच्या पहिल्या चेंडूवर राहुलने 1 धाव घेतली. अश्विनचा दुसरा चेंडू निर्धाव गेला. तिसऱ्या चेेंडूवर शाकिब बाद झाला. तसेच चाैथ्या चेंडूवर नारायणही बाद झाला. मात्र राहुल त्रिपाठीने 5 व्या चेंडूवर षटकार ठोकत कोलकाताला विजय मिऴवून दिला.
महत्वाच्या घडामोडी –
“माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तब्येतीत बिघाड; रूग्णालयात केलं दाखल”
देगलूर पोटनिवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती होणार; ‘या’ भाजप आमदाराचा दावा
ओबीसी आरक्षणाचा नेमका विचका कोणी केला हे सगळ्यांनाच ठाऊक- धनंजय मुंडे