रत्नागिरी : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा शिवसेनेला माफियासेना म्हटलं. अशातच आता राष्ट्रवादीही सोमय्यांविरोधात आक्रमक झाली असून कोकणातल्या एका राष्ट्रवादी नेत्यानं किरीट सोमय्यांनी कोकणात आगामी दौऱ्याला येऊनच दाखवालं असं थेट आव्हान दिलंय.
हे ही वाचा : हे सुराज्य स्थापन करताना…; राज ठाकरेंनी मनसैनिकांसोबत घेतली शपथ
भाजप आमदार किरीट सोमय्या यांचा दापोली दौरा वादातील ठरण्याची शक्यता आहे. 26 मार्च रोजी होणाऱ्या किरिट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यावरून कोकणात वातावरण चांगलचं तापलं आहे. किरीट सोमय्या हे कोकणात येऊन कोकणातल्या पर्यटन व्यवसायिकांना अडचणीत आणण्याचे काम करत आहेत. ते व्यवसायिकांना घाबरवत आहेत, असा आरोप स्थानिक नेत्यांकडून करण्यात आलाय.
दरम्यान, 26 मार्च रोजी होणाऱ्या किरिट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यावरून कोकणात वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. सोमय्या यांनी येऊन दाखवावे, आम्ही त्यांना रोखणार, त्यांना जशास तसे उत्तर देणार अशी भूमिका माजी आमदार संजय कदम यांनी घेतली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
IPL 2022! पंजाब किंग्सची साथ का सोडली?; अखेर के.एल.राहुलने केला खुलासा, म्हणाला…
शिवजयंती तिथीनुसार साजरी करायची की तारखेनुसार?; राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना- मनसेचा वाद
एम आय एम ची आहे हार्डलाईन, त्यामुळे…; मविआ-एमआयएम युतीच्या चर्चांवर रामदास आठवलेंची कविता