किरीट सोमय्या मला घाबरतो, त्यामुळे…; शिवसेना नेत्याची जीभ घसरली

0
526

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरुच आहे. संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर किरीट सोमय्यांनी INS विक्रांतच्या नावाखाली 58 कोटी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

संजय राऊतांनी केलेल्या आरोपानंतर शिवसैनिकही आक्रमक झाले असून राज्यात विविध भागात सोमय्यांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. अशावेळी शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शेलक्या शब्दात सोमय्यांवर टीका केलीय.

हे ही वाचा : मोठी बातमी; मनसेच्या पुणे शहर अध्यक्षपदावरून वसंत मोरेंची उचलबांगडी

किरीट सोमय्या मला घाबरतो. एकदा विमानात मी त्याचा हात पकडला होता. मी त्याला काय किरीट म्हणतो. तो सतत हा हु हा हु करत असतो. त्यामुळे मी त्याला शक्ती कपूर म्हणतो. माझ्या समोर आला तर मी त्याला मारेन. मी मतांची खंडणी घेतली, पैशांची नाही. माझ्यावर ईडी पडू शकत नाही, असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटील यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय आपण उठणार नाही, असा पवित्रा चंद्रकांत खैरे यांनी घेतला होता.

महत्वाच्या घडामोडी –

“मनसे ‘या’ ठिकाणी लावणार दिवसातून 5 वेळा हनुमान चालिसा”

…तर सोमय्या बाप-बेटांना जेलमध्ये जावंच लागणार; संजय राऊतांचा इशारा

“मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरेंची नाराजी खुद्द राज ठाकरे दूर करणार, शिवतीर्थवर भेटीसाठी बोलावलं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here