किरीट सोमय्या हे शिखंडी आहेत, केवळ साडी नेसवणं बाकी- किशोरी पेडणेकर

0
164

मुंबई : मुंबईच्या महापौरांनी हेराफेरी केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देत सोमय्यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे.

किरीट सोमय्या हे सध्या शिखंडीचा रोल करत आहेत. महाभारतात शिखंडी कौरवांच्या आडून वार करत होते. आणि फ्रॉड हा शब्द बोलायचा नाही. फ्रॉड म्हणजे सोमय्या असा समानार्थी शब्दच लोकांमध्ये प्रचलित झालाय., असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी सोमय्यांना टोला लगावला आहे.

किरीट सोमय्या हे शिखंडी आहेत. साडी नेसायचे बाकी आहेत, ते पण आम्ही करु. किरीट सोमय्या हे शिखंडीचा रोल करत आहेत, ते त्याच लायकीचे आहेत., असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी किरीट सोमय्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, वारंवार तक्रारी करायच्या आणि श्वानासारखे आवाज काढून इतर लोकांना डिस्टर्ब करायची सोमय्या यांना सवय आहे. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, हे आम्ही नेहमीच सांगत आलोय., असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

अमृताताई, आपल्या नावातील ‘अ’ निघाले तर ‘मृता’ राहील; शिवसेनेचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

“काँग्रेस नेते सचिन पायलट यांना कोरोनाची लागण”

“किरीट सोमय्या हे गिधाडासारखे पेपर घेऊन फडफडतायत, त्यांनी कितीही फडफडू द्या, आमचं सरकार 5 वर्ष चालणार”

आता आम्ही म्हणतोय बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर; संजय राऊतांचं किरीट सोमय्यांना आव्हान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here