Home महाराष्ट्र “किरीट सोमय्या देशद्रोही व्यक्ती, त्याची जागा फक्त तुरूंगातच”

“किरीट सोमय्या देशद्रोही व्यक्ती, त्याची जागा फक्त तुरूंगातच”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरुच आहे. संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर किरीट सोमय्यांनी INS विक्रांतच्या नावाखाली 58 कोटी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

संजय राऊतांनी केलेल्या आरोपानंतर शिवसैनिकही आक्रमक झाले असून राज्यात विविध भागात सोमय्यांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. जळगावातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी सोमय्या यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं हाती बांधलं घड्याळ”

लोकांच्या भावनेचा गैरवापर करून कोट्यावधी रुपये जमा करून हडप करायचे. पुन्हा विरोधकांवर सतत खोट्या आरोप व तक्रारीच्या फैरी झाडत समाजात गोंधळ निर्माण करायचा. ही तर शत्रुराष्ट्रासारखा पद्धतशीर कट रचण्यासारखाच प्रकार आहे. अशी देशद्रोही व्यक्ती समाजात वावरणे घातक आहे. त्यांची जागा फक्त तुरूंगातच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना नेत्यांनी यावेळी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचं काैतुक, म्हणाले…

“पुणे अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… काहीही झालं तरी…”

मुंबईत येताच संजय राऊतांचा भाजपावर निशाणा; म्हणाले…