“किंग्स इलेव्हन पंजाबचा राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरवर दणदणीत विजय”

0
192

दुबई : आयपीएलचा आजचा सामना राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरचा 97 धावांनी पराभव केला.

किंग्स इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी गमावत 206 धावा केल्या. पंजाबकडून कर्णधार राहूलने शतक ठोकताना 69 चेंडूत 132 धावा केल्या. ज्यात त्याने 14 चाैकार व 7 षटकार मारले. तर मयंक अगरवालने 26, निकोलस पूरनने 17, तर शेवटी करूण नायरने 8 चेंडूत 15 धावा केल्या. राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून शिवम दुबेने 4 षटकात 33 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तर युजवेंद्र चहलने 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने 20 षटकात केवळ 107 धावा केल्या. बेंगलोरकडून वाॅशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 30 धावा केल्या. त्याने 27 चेंडूंचा सामना करताना 2 चाैकार व 1 षटकार मारला. तर एबी डिव्हीलियर्सने 18 चेंडूत 28 धावा केल्या. पंजाबकडून रवी बिष्णोई व मुरूगन अश्विनने 3 विकेट घेतल्या. तर शेल्डन काॅट्रेलने 2 तर मोहम्मद शमी व ग्लेन मॅक्सवेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

अति तिथे माती.. शिवसेनेचा अंत जवळ आलाय; निलेश राणेंची शिवसेनेवर टीका

के.एल. राहूलचे शतक; पंजाबचे राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरसमाेर 207 धावांचे लक्ष्य

…अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील; रावसाहेब दानवेंचा सरकारला इशारा

विनायक राऊतांना शिवसेनेत काडीची किंमत नसल्यामुळे जगामध्ये कोणालाच किंमत नाही असं त्यांना वाटतं- निलेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here