Home महाराष्ट्र “खोत आणि पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना भडकावलं आहे, वेळ आल्यावर त्यांनाही बघू”

“खोत आणि पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना भडकावलं आहे, वेळ आल्यावर त्यांनाही बघू”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारले आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपने पाठिंबा दिला असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत  हे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. यावरुन परिवहन मंत्री अनिल परब यांनी टीका केली आहे.

सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना भडकावले आहे, वेळ आल्यावर त्यांनाही बघू, असा इशारा अनिल परब यांनी यावेळी दिला आहे. त्याचबरोबर, एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचं आवाहनही त्यांनी केले आहे.

हे ही वाचा : राष्ट्रवादीचे टायमिंग चुकलं; बहुमत नसतानाही भाजपाने ही निवडणूक बिनविरोध जिंकली

सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनीच लोकांना दिवाळीत वेठीस धरले आहे. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत कामावर येण्याची तयारी कर्मचारी दाखवत आहेत. त्यांना संरक्षणाची हमी दिली आहे. विलीनीकरणाच्या मागणीबाबत त्यांनी समितीसमोर जावे. राजकीय पक्ष पोळी भाजून बाहेर येतील पण नुकसान तुमचे होईल. त्यावर विचार करण्यासाठी उच्च न्यायालयाने बारा आठवड्यांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून कामावर रुजू व्हावे, असं अनिल परब म्हणाले आहेत.

दरम्यान, मी आझाद मैदानावर जाईन. पण त्यांनी अडेलट्टूची भूमिका केली तर? मी न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे काम करेन. माझ्यावर टीका करा, पण कर्मचाऱ्यांचे नुकसान होता कामा नये, असंही परब यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीचे टायमिंग चुकलं; बहुमत नसतानाही भाजपाने ही निवडणूक बिनविरोध जिंकली

‘महाराष्ट्र सरकारने मुस्लिम मोर्चे थांबवले नाहीत तर…; नितेश राणेंचा राज्य सरकारला इशारा

राष्ट्रवादीचे भाजपच्या नगरसेवकांना फोडण्याचे स्वप्न भंगले; भाजपच्या ‘या’ नेत्याची टीका