मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच मूळगावात पराभव पत्करावा लागला. पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खानापूरमध्ये सहा पैकी तीन जागा आम्ही जिंकल्या आहेत. दोन जागांवर कमी मताने आम्ही पराभूत झालो आहे. पण तरीही गावाने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
दरम्यान, एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही. महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील आहे, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
परळीत भाजपला मोठा धक्का; धनंजय मुंडे गटाचा दणदणीत विजय
चौंडी गावात राम शिंदेना धक्का; रोहित पवारांची बाजी
“सातारामध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला”
“धनंजय मुंडे यांच्याबाबत विरोधकांनी राजकारण करु नये”