Home महाराष्ट्र विधान परिषद उमेदवारांच्या निवडीवर खडसेंनी सोडलं मौन; म्हणाले…

विधान परिषद उमेदवारांच्या निवडीवर खडसेंनी सोडलं मौन; म्हणाले…

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषद निवडणूक जाहीर केली आहे. भाजपने आपले चार उमेदवार घोषित केलं आहेत. दिग्गजांना डावलून भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यावर अखेर क्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मौन सोडलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांवर बहिष्कार घालणारे गोपीचंद पडळकर यांना संधी दिली. राष्ट्रवादीतून आलेल्या रणजित सिंह मोहिते यांनाही पक्षानं संधी दिली. मी, पंकजा मुंडे, बावनकुळे यांना डावलण्यात आलं. पक्ष कोणत्या दिशेनं चालला आहे, याचा विचार करण्याची गरज आहे,” असं म्हणत एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली.

आम्हाला प्रथमत: आम्हाला सांगण्यात आलं की खडसे, पंकजा मुंडे आणि बावनकुळे यांचं नाव दिल्लीला शिफारस म्हणून पाठवलं आहे. मात्र सध्या जी नावं येत आहेत ती नावं नवीन आहेत. म्हणजेच नव्या चेहऱ्यांना भाजपने संधी दिली आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजप कडून  प्रवीण दटके, गोपीचंद पडाळकर, डॉ. अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्र्यानी आयुष्य घरात बसून काढलंय त्यांना काही फरक पडणार नाही- निलेश राणे

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाखांची मदत; उद्धव ठाकरेंची घोषणा

औरंगाबादमध्ये 16 मजूरांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू

करोनाच्या मृतांचं राजकारण नको, राजेश टोपे यांच विरोधकांना प्रत्युत्तर