मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या.
पत्रकारांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण कधी येते असा प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी ‘सामना’ची पायरी चढल्यावर बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते, असं भावनिक उत्तर दिलं. तसेच सलग 30 वर्षे बाळासाहेबांसोबत काम केलं असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं.
मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस 50 वर्षापूर्वी खचला होता. खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचं बळ दिलं. आज महाराष्ट्रातील मराठी माणूस आत्मविश्वासानं उभा राहतो त्याचं श्रेय बाळासाहेब ठाकरेंना जाते, असंही राऊत म्हणाले.
दरम्यान, बाळासाहेबांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाला वेगळ वळण दिलं, त्यांनी हिंदुत्वाची लाट निर्माण केली. बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण ठेवावं लागेल, असंही संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“आघाडीत बिघाडी करायची नाही, त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही”
“जनतेसाठी जो झटतो, त्याला लोक कधीही विसरत नाहीत”
झाडावरील पानही पडले तरी पान का पडले म्हणून भाजप आंदोलन करु शकताे- जयंत पाटील
…पण नेहमी पळवाट काढणं बरं नव्हे; निलेश राणेंचा अजित पवारांना टोला