मुंबई : राज्यातील तीन पक्षांच्या आघाडी सरकारचा कारभार आणीबाणीची आठवण करून देणारा आहे, असं म्हणत भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अटकेच्या भीतीने आणीबाणीला पाठिंबा देणारी शिवसेना आज काँग्रेसच्या पाठिंब्याने राज्यात सत्तेत आहे. राज्यातील तीन पक्षांच्या आघाडी सरकारचा कारभार आणीबाणीची आठवण करून देणारा आहे. राज्य सरकारविरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दडपण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहेत, असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत.
दरमयान, आणीबाणीत झालेले अत्याचार, सरकारी दडपशाही याचा प्रत्यय राज्यातील जनता सध्या घेत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने सध्या गळे काढले जात आहेत. मात्र आज राज्य सरकारच्या विरोधात कोणी बोलू शकत नाही, लिहू शकत नाही अशी आणीबाणी सदृश स्थिती आहे, असंही केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“देशमुखांवरील कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार; संजय राऊत राष्ट्रवादीची सुपारी वाजवतायेत”
OBC राजकीय आरक्षणावरून भाजपा आक्रमक; उद्या राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन
संपूर्ण राज्य आता तिसऱ्या स्तरात, तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध सर्व जिल्ह्यात लागू; नवी नियमावली जारी
करावं तसं भरावं, त्यामुळे ईडीच्या कारवाईवर राष्ट्रवादीने राजकारण करू नये- नारायण राणे