आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. अशातच आता शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर यांनी एक मोठा गाैफ्यस्फोट केला होता.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेची भाजपसोबत चर्चा सुरू होती, असा मोठा गाैफ्यस्फोट दीपक केसरकरांनी काल माध्यमांशी बोलताना केला होता. यावरून आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : मनसेत पक्ष प्रवेशाचा धुमधडाका सुरुचं; अनेक युवक कार्यकर्त्यांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”
तीन पक्ष बदललेल्या आणि चौथ्या पक्षात प्रवेश करण्यास उत्सुक असलेल्या लोकांवर किती विश्वास ठेवायचा यावर आपण विचार केला पाहिजे, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी यावेळी केसरकरांना लगावला.
गौप्यस्फोट करणारे अनेक कारणं देत आहेत. शिवसंवाद यात्रेदरम्यान एका सभेतून दुसऱ्या सभेमध्ये जाईपर्यंत यांची कारणं बदललेली असतात. कोणालाही ही गद्दारी आवडलेली नाही. अनेकवेळा लोक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत. पण राजीमाना देण्याची नम्रता त्यांच्यात होती. हे सरकार बेकायदेशीर आहे. त्यामुळे विषय बदलत राहायचे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत राहायचे हा प्रयत्न सुरू आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिवसेनेचा भाजपाला धक्का; भाजपाच्या ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
मुंबै बँकेवर भाजप-राष्ट्रवादीची सत्ता; भाजपाकडे अध्यक्षपद तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्षपद
हिंमत असेल तर महापौरांची निवड जनतेतून करा; मनसेचा शिंदे सरकारला इशारा