मुंबई : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर नगरसेविकेचं लैगिक शोषण आणि त्यांना धमकावणं यावरून त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर अणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात चांगलीच खडाजंगी झालेली पाहायला मिळत आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपल्या पक्षाच्या या विकृती आपल्या भाजपचे संस्कार दाखवतात… का येथे ही क्लिन चीट देणार..?, असं म्हणत रूपाली चाकणकर यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. यावर चित्रा वाघ यांनीही सडेतोड दिलं आहे.
ज्याने गुन्हा केला असेल त्याला त्याची शिक्षा मिळेलचं नेत्यांच्या चुकींचं समर्थन मी या आधीही केलं नाही आणि आताही करत नाही. चुकीच्याचे समर्थन कधीचं करणार नाही पोलिस कारवाई करतीलचं तुमचे दात जास्तचं दिसताहेत ते सांभाळून ठेवा कधी घशात जातील याचा नेम नाही , असं म्हणत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांना टोला लगावला आहे.
ज्याने गुन्हा केला असेल त्याला त्याची शिक्षा मिळेलचं नेत्यांच्या चुकींचं समर्थन मी या आधीही केलं नाही आणि आताही करत नाही @BJP4Maharashtra चुकीच्याचे समर्थन कधीचं करणार नाही पोलिस कारवाई करतीलचं तुमचे दात जास्तचं दिसताहेत ते सांभाळून ठेवा कधी घशात जातील याचा नेम नाही @Dev_Fadnavis https://t.co/6kGVDcp3zZ
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 29, 2020
महत्वाच्या घडामोडी-
शिवसेना औरंगाबादचे रक्षण काय करणार? औरंगाबादचे रक्षण भाजपच करू शकते- चंद्रकांत पाटील
ठाकरे सरकार करणार 1 लाख 1 हजार पदांची मेगाभरती !
…म्हणून बाळासाहेबांनी इंदिरा गांधीजींशी मांडवली केली; निलेश राणेंच बाळासाहेब ठाकरेंवर टिकास्त्र
सत्तेसाठी शिवसेनेने काय-काय तडजोड केली याची माहिती समोर आली पाहिजे