दादा खेळत रहा, वेळ चांगला जाईल; शिवसेनेचा चंद्रकांत पाटलांना टोला

0
570

मुंबई : दादा खेळत रहा, वेळ चांगला जाईल, असं म्हणत  शिवसेनेनं आजच्या सामना अग्रलेखातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

डिसेंबरनंतर ते पुढची तारीख देतील. अशा तारखांवरील तारखा पडतच राहतील आणि पाच वर्षे कधी निघून गेली हे चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांना कळणार नाही. हा खेळ फारच रंजक आहे . दादा खेळत रहा, वेळ चांगला जाईल, असं म्हणत शिवसेनेनं सामनातून चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

विरोधी पक्षाने आपली भूमिका जोरकसपणे मांडायला हवी. पण आम्हाला कोणत्याही मार्गाने सत्ता काबीज करू असे वारंवार सांगणे हे मोदी यांच्या पक्षाला शोभणारे नाही, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे.

बहुमताची सरकारे दाबदबावाने अस्थिर करायची व त्यातून महाराष्ट्रासारख्या राज्यात अराजकाची चूड लावायची हे तंत्र अघोरी आहे. त्यांनी धमकी दिलीच आहे. आता कृती करून दाखवावी, असंही सामनातून म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“आपमतलब्यां’चा पराभव झाला, केजरीवालांच्या झाडूने सगळयांना साफ केलं”

आपण यावर विचार करणार आहोत की हा दिवसही इतर दिवसांप्रमाणेच असणार?, सत्यजीत तांबेंचा काँग्रेसला सवाल

तीन पेक्षा ज्यास्त जागा जिंकल्या तर हा भाजपसाठी हा विजयच- चंद्रकांत पाटील

भाजपच्या ‘ह्या’ खासदाराने केलं अरविंद केजरीवाल यांचं कौतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here