आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते राज्यात भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा करत आहेत. अशातच आता माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनीही महाविकास आघाडीवर निशाणा साधत मोठं वक्तव्य केलं आहे.
हे ही वाचा : “मोठी बातमी! पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची बिनविरोध निवड”
ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचे हाल केले आहेत. कोण काही बोललं की लगेच सरकार त्यावर कामात अडथडा निर्माण केल्याचा आणि तडीपाराचा गुन्हा दाखल करत आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे. त्याचबरोबर आमचं सरकार येणार हाय, तवा तुम्हाला सुट्टी नाय, हे ध्यानात ठेवा, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.
दरम्यान, राज्य सरकारचा भ्रष्ट कारभार आता दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसतंय. दिवसभर गोळा झालेला पैसा संध्याकाळी तिघे भाऊ म्हणजेच तिन्ही पक्ष एकेक रुपया वाटून खात आहेत., अशी टीका सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करा; चंद्रकांत पाटील यांची मागणी
अजित पवारांनी करून दाखवलं, राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची नाराजी करणार दूर; मुंबईकडे रवाना
भाजपाचा काँग्रेसला मोठा धक्का; गोव्यातील ‘हा’ बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश?