कराड यांची ‘जनआशीर्वाद यात्रा’ गोपीनाथगडावरून निघणार; पंकजा मुंडे दाखवणार हिरवा झेंडा

0
663

बीड : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड ‘जनआशीर्वाद यात्रा’निमित्ताने औरंगाबाद, नांदेड, परभणी आणि जालना या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.

कराड यांची ‘जनआशीर्वाद यात्रा’ गोपीनाथगडावरून निघणार असून भाजपा नेत्या पंकजा मुंडे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी दिली आहे.

येत्या 16 ऑगस्टपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात ‘जनआशीर्वाद यात्रा’ काढण्यात येणार आहे. तर केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे नवनियुक्त मंत्री ‘जनआशीर्वाद यात्रे’द्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

पीडित महिलेची तक्रार हा राठोडांना टीआरपीचा विषय वाटतो का?; चित्रा वाघ कडाडल्या

“महाराष्ट्राला अजून शिवाजी महाराज कळालेच नाहीत”

“चिक्की प्रकरणाशी पंकजा मुंडेंचा संबंध जोडणं म्हणजे, शिळ्या कढीला ऊत आणण्याचं काम”

“अभिनेत्री राधिका आपटेचा ‘तो’ न्यूड फोटो सोशल मिडियावर व्हायरल, नेटकरी म्हणाले…;

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here