“कंगणा रणाैत आता निवडणुकीच्या रिंगणात?; करणार ‘राष्ट्रवादी’चा प्रचार”

0
990

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणाैत आता निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. याबाबत तिने महत्त्वाची घोषणा केली आहे. जो पक्ष राष्ट्रवादी असेल त्याला मी पाठिंबा देईन, अशी घोषणा कंगनाने केली आहे.

हे ही वाचा : अखेर ठरलं! सांगली जिल्हा बँकेचं अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याकडे, तर कदम ठरवणार काँग्रेसचा उपाध्यक्ष!

कंगना रणाैतनं आज उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील ठाकूर बांके बिहारींचे दर्शन घेतलं. देवाचे दर्शन घेतल्यानंतर कंगनाने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी कंगनाला निवडणुकीत कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार असा प्रश्न केला. त्याला उत्तर देताना कंगना म्हणाली, मी राष्ट्रवादीचा प्रचार करेन. मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही आणि निवडणूकीत जे पक्ष राष्ट्रवादी आहेत त्याच पक्षाला पाठिंबा देईन, असं कंगनाने म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

मुंबईत भाजप-शिवसेना नगरसेवकांमध्ये जोरदार राडा

मनसे कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा; राज ठाकरे घेणार अंतिम निर्णय

“पुण्यात केवळ शनिवारवाडाच नाही तर…”; अमोल कोल्हेंचं ट्विट चर्चेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here