मुंबई : मुंबईत काल खूप मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक रेल्वेसेवा बंद होत्या. तर अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं. यावरून भाजप नेते अॅड.आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
पाऊस जास्त पडला सांगत पावसावर खापर फोडू नका? नुसते फिरुन उपयोग काय? ब्रिटानियाचे पंपिंग स्टेशन पुर्ण क्षमतेने का चालत नाही ते सांगा? मायक्रो टनेलची कामे वेळेत पुर्ण का झाली नाही ते ही सांगा? पाण्याचा निचरा होण्यास ऐवढा विलंब कधी होत नव्हता, मग आता का विलंब होतोय हेही सांगा?, असं म्हणत आशिष शेलार यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.
हिंदमाता, वरळीसह अनेक भागातील पाण्याचा निचरा का होत नाही? मुंबईकरांच्या घरातील पाणी अजून कमी का होत नाही?, 116% नालेसफाईचे दावे कुठे गेले?, रात्री अजून पाऊस झाला तर मुंबईकरांनी करायचे काय?, कलानगरचे पाणी तातडीने ओसरते मग मुंबईतील अन्य ठिकाणांचे का नाही? असा सवालही आशिष शेलारांनी राज्य सरकारला केला आहे.
पाऊस जास्त पडला सांगत पावसावर खापर फोडू नका?
नुसते फिरुन उपयोग काय?
ब्रिटानियाचे पंपिंग स्टेशन पुर्ण क्षमतेने का चालत नाही ते सांगा?
मायक्रो टनेलची कामे वेळेत पुर्ण का झाली नाही ते ही सांगा?
पाण्याचा निचरा होण्यास ऐवढा विलंब कधी होत नव्हता, मग आता का विलंब होतोय हेही सांगा?
(1/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 23, 2020
हिंदमाता, वरळीसह अनेक भागातील पाण्याचा निचरा का होत नाही? मुंबईकरांच्या घरातील पाणी का अजून कमी होत नाही?
116% नालेसफाईचे दावे कुठे गेले?
रात्री अजून पाऊस झाला तर मुंबईकरांनी करायचे काय?
कलानगरचे पाणी तातडीने ओसरते मग मुंबईतील अन्य ठिकाणांचे का नाही?
(2/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 23, 2020
महत्वाच्या घडामोडी-
मुंबईकर पुरात बुडले आणि पालकमंत्री पर्यटनात रमले; अतुल भातखळकरांचा आदित्य ठाकरेंना टोला
“अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण”
मला प्रतिवादी करण्याचा विचार हास्यास्पद; संजय राऊतांचा कंगणा रणाैतला टोला
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात FIR दाखल