नवी दिल्ली : आगामी 5 वर्षांमध्ये देशातील पायाभूत सुविधा अमेरिका आणि युरोपसारख्या होतील.,असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
नव्या भारताच्या निर्मितीसाठी आम्ही एक भक्कम पाया तयार केला असून यामध्ये गेल्या 5 वर्षात 17 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केलं असल्याचं नितीन गडकरी म्हणाले. ते दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते.
देशातील विकासाच्या बाबतीत मागासलेला भाग, पूर्वोत्तर आणि सीमाभागांचा विकास हे सरकारचे सर्वांत मोठं लक्ष्य आहे. ग्रीन एक्सप्रेसवे कॉरीडोरचं नेटवर्क पूर्णपणे सज्ज आहे. ज्यात दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि 30 किमी द्वारका द्रुतगती मार्गाचा समावेश असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.
दरम्यान, देशातील सर्व प्रकल्पांवर 10 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प प्रत्यक्षात आल्यानंतर दिल्ली बॉर्डर सिंगापूरसारखी दिसेल. सीमेवरील रस्ते बांधण्याचे 90 टक्के काम पूर्ण झालं आहे. तसेच या ठिकाणी ऑस्ट्रेलिया टनेल मॉडेल पद्धतीने काम केलं जात असल्याचंही गडकरींनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“सत्ता गेल्यानं भाजप विचलित, मृतांच्या टाळूवरचं लोणी खायलाही विसरत नाहीत”
श्रेयस अय्यर INJURY! ना रहाणे, ना अश्विन, ना स्मिथ; ‘हा’ असेल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार
फडणवीसजी लूज बॉलवरच मोठी विकेट जाते; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
“मोठी बातमी! राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तब्येत बिघडली, रूग्णालयात केलं दाखल”