Home महाराष्ट्र फक्त लॉकडाऊन केलं, की आपलं कार्य संपलं असा विचार सरकारने करू नये-...

फक्त लॉकडाऊन केलं, की आपलं कार्य संपलं असा विचार सरकारने करू नये- सुधीर मुनगंटीवार

मुंबई : राज्यातल्या करोनाच्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या परिस्थितीवर लॉकडाऊन हाच पर्याय असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी आणि मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांशी चर्चा सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.

लॉकडाऊनचा निर्णय तर्कावर आधारीत होईल. पण लॉकडाऊन करताना काही पथ्य ठेवावी लागतील. काही नियोजन करावे लागेल. सरकारला काही जबाबदारी घ्यावी लागेल. फक्त लॉकडाऊन केलं, की आपलं कार्य संपलं असा विचार सरकारने करू नये, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

विजेच्या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल, सर्वसामान्यांच्या संदर्भात पॅकेजचा निर्णय घेतला जाईल का? छोट्या उद्योगांचं काय होईल? महिन्याला इएमआय भरणाऱ्यांसाठी राज्य सरकार काही करणार आहे का? छोटे दुकानदार, फुटपाथवरील फेरीवाले, छोटे व्यापारी, छोट्या उद्येजकांच्या बाबतीत सरकारची काय भूमिका आहे? नगरपरिषद, महानगरपालिका यांच्या मार्केट-कॉम्प्लेक्समधल्या दुकानदारांना आपण दुकानं बंद करायला लावतो आहोत. त्यांच्या भाड्याच्या पैशांचं आपण काही करणार आहोत का? असे सवाल करत अशा मुद्द्यांवर सरकारने चर्चा करायला हवी”, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

कोरोना रूग्णांचा आकडा आटोक्यात आणण्यासाठी लाॅकडाऊन आवश्यक- अशोक चव्हाण

“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत ठाकरे सरकार चालणार”

“लाॅकडाऊन विरोधात साताऱ्यात उदयनराजेंकडून भीक मांगो आंदोलन; पहा व्हिडिओ

मोठी बातमी! लाॅकडाऊनशिवाय पर्याय नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे