मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही मागण्या केल्या आहेत.
मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे आदित्य ठाकरे यांची तातडीने मंत्रिपदी नियुक्ती केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बहुजन युवकांचे पालकत्व स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी या पत्रात केली आहे.
सदर नियुक्त्यांचा अधिकार हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. त्यासाठी पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींना हात जोडून विनंती करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशीही मागणी पडळकरांनी या पत्रात केली.
महत्वाच्या घडामोडी –
मोदींनी महाराष्ट्राचं कौतुक केलं, पण फडणवीस टीका करतात, मग योग्य कोण?; जयंत पाटलांचा सवाल
ऑक्सिजनवरील जीएसटी हटवा; जयंत पाटलांची अर्थ मंत्रालयाकडे मागणी
‘मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जावंच लागेल’, पण…; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सल्ला
केंद्र सरकार हे जाणून बुजून करत आहे, की त्यांना कामं करता येत नाही- नवाब मलिक