मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य भाजप नेते, कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती केली आहे.
कोरोना काळात आधी स्वत:ची तब्येत सांभाळा, कुटुंबियांना जपा आणि शक्य होईल तसं सगळी कामं ऑनलाईन करा, असं आवाहन गडकरी यांनी देवेंद्र फडणवस आणि भाजप नेते, कार्यकर्त्यांना केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली दौरा केला. आवश्यक आहे जणं. पण त्यावेळी त्यांच्या गाडीत किती लोकं होती? आता सर्व काम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने करा. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सोय आहे. उगाच कुणाच्या घरी जाऊ नका. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधा. तुम्ही जेवढं लाईटली घेत आहात तेवढं हे साधं नाही. आपण अनेक कार्यकर्ते गमावले आहेत’, अशा शब्दात गडकरी यांनी फडणवीसांना दौरे टाळण्याची विनंती केलीय.
भाजप नागपूर महानगर कार्यकारिणी बैठकीच्या समारोपप्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद. https://t.co/RDy0RpBSVi via @YouTube
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) May 9, 2021
महत्वाच्या घडामोडी –
देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर दरेकरांचाही ठाकरे सरकारवर निशाणा; आकडे लपवले जात असल्याचा आरोप
नुसता विरोधाला विरोध करणं चुकीचं आहे- जयंत पाटील
“राज्य सरकारने स्वतःची पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची आवश्यकता”