शिवसेनेनं सामनाच्या संपादकीय मधून केंद्र सरकारवर टिका केली होती. तसंच “रघुराम राजन दिल्ली सरकारधार्जिणे नसल्याने आता त्यांना पद्धतशीर खोटं पाडलं जाईल, असं म्हणत केंद्र सरकारवर टीका केली होती. यावरून अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
अपेक्षेप्रमाणे मुखपत्रातून आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘आरती’ सुरू झाली आहे. रघुराम राजन, राहुल यांच्या नथीतून तीर चालवले गेले. स्वाभाविकच आहे. जो है पप्पू के यार, कैसे करे मोदीजी से प्यार?, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भारतात किमान 10 कोटी लोकांना रोजगार गमवावा लागेल, असे रघुराम सांगतात व हे धक्कादायक आहे, पण रघुराम हे दिल्ली सरकारधार्जिणे नसल्याने त्यांना पद्धतशीर खोटे पाडले जाईल व सर्व काही आलबेल आहे, असे ढोलताशे वाजवले जातील. त्याने परिस्थिती बदलणार आहे काय? असं म्हणत शिवसेनेनं केंद्रावर निशाणा साधला होता.
अपेक्षे प्रमाणे मुखपत्रातून आज पुन्हा मा. पंतप्रधानांची ‘आरती’ सुरू झाली आहे. रघुराम राजन, राहुल यांच्या नथीतून तीर चालवले गेले. स्वाभाविकच आहे.
जो है पप्पू के यार
कैसे करे मोदीजी से प्यार?— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 2, 2020
महत्वाच्या घडामोडी-
मी काही गमावलं नाहीये…; इरफान खानच्या पत्नीची भावनिक पोस्ट
…तर महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्रावर संकटं घेऊन आली असं म्हणावं लागेल
महाराष्ट्रातील सरकार स्थिर होतं, स्थिर राहील; जयंत पाटलांचा विरोधकांना टोला
उद्धव ठाकरेंच्या कामकाजावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले…