Home महाराष्ट्र नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्याची विनंती महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यांनी यासंबंधी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवलं आहे.

उपरोक्त निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिक एकमेकांच्या संपर्कात येतील. त्यामुळे या संसर्गजन्य रोगांचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगपालिकेची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्यात यावी, असं जितेंद्र आव्हाड यांनी पत्रात लिहलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारने खबरदारी म्हणून सर्व शाळा, कॉलेजला 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

कोरोना गो हा टिंगल-टवाळीचा विषय नाही- रामदास आठवले

अजित पवारांचा कॉन्फिडन्स मानावा लागेल; निलेश राणेंच टिकास्त्र

केंद्रात गो गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील हे तुम्हाला पण समजणार नाही- रुपाली चाकणकर

एक दिन हम बजा देंगे कोरोना के बार…, रामदास आठवलेंनी रचली कविता