मुंबई : तानाजी मालुसरेंच्या शौर्यगाथेवर आधारीत TANHAJI हा हिंदी चित्रपट 10 जून 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. पण हा ट्रेलर रिलीजनंतर हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
ओम राऊत तुमच्या तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला , त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल. याला धमकी समजली तरी चालेल, असं ट्वीट राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हड यांनी केलं आहे.
ओम राऊत तुमच्या तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला , त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल.
याला धमकी समजली तरी चालेल.#TanhajiTrailer @omraut— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 20, 2019
तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला, त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल.
याला धमकी समजली तरी चालेल; @Awhadspeaks@omraut #TanajiTheUnsungWarrior pic.twitter.com/qqNKyX8Jh6— NCP Thane (@ThaneNCP) November 20, 2019
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्वीटनंतर NCP ठाणे यांनीही एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये जितेंद्र आव्हाड या सिनेमाच्या ट्रेलरविषयी बोलताना दिसत आहेत.