आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल ठाणे येथे भव्य सभा भरवण्यात आली. या सभेत जोरदार टोलेबाजी करत राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
यांची बाजू घेणारे इकडचे आव्हाड. काय पण चेहरा आहे.. नागानं फणा काढावा, असा चेहरा आहे., असा टोला राज ठाकरेंनी जितेंद्र आव्हाडांना लगावला. यावरून जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असून ते…; चंद्रकांत पाटील
माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे असं जर तुम्ही म्हणाल तर मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे हे म्हणावं का? तो भाग कोणता हे महाराष्ट्र ओळखतो, असं जोरदार प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंना दिलं. यावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली.
जितेंद्र आव्हाड यांनी आपले तोंड बंद ठेवावे. राजकीय टिपण्णी करावी, वैयक्तिक विधाने करू नये. नाहीतर आम्ही ही येऊरच्या बंगल्यातील गोष्टी बाहेर काढू, असा इशारा संदीप देशपांडे यांनी यावेळी दिला. तसेच हे राष्ट्रवादीचे पुरवठा मंत्री आहेत, असा टोलाही संदीप देशपांडे यांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
भाऊ दवाखान्यात दाखल झाल्याचं कळताच दोन्ही बहिणी धावल्या; तब्बेतीची केली विचारपूस
गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
मोठी बातमी : ठाण्यातील सभेनंतर राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल