शिवसेनेला खरं बोललेलं झोंबतं आणि अमित शाह हे खरं बोलले- चंद्रकांत पाटील

0
256

पुणे : अमित शाह रविवारी कोकणात खासदार नारायण राणे यांच्या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी बोलताना अमित शाह यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली होती, यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेला खरं बोललेलं झोंबतं, अमित शाह हे खरं बोलले ते शिवसेनेला फार झोंबलं. शिवसेनेने प्रतिक्रिया दिली की, आजपर्यंत शिवसेनेला कोणी संपवू शकलेलं नाही, मुख्य म्हणजे अमित शाह यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा केलेलीच नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“हे सरकार आल्यानंतर ज्या प्रकारे सरकारचा व्यवहार चालला आहे. तो आम्ही पाच वर्षे आमच्याकडे राज्य असताना केला असता तर शिवसेना संपली असती, हे खरं आहे. आम्ही कधी खुन्नसने वागलो नाही. सरकार सरकार आहे. जुने हिशोब काढून बसण्याचं कारण नाही. शिवसेनेला आणि संजय राऊत यांना पराचा कावळा करण्याची सवय आहे. त्यानुसार त्यांनी प्रतिक्रिया दिल्या” असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले गिरीश प्रभुणे यांची भेट घेण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे चिंचवड येथील गुरुकुलम येथे आले होते. तेव्हा, त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी

एकिकडे मुंबईला लाखांची पोशिंदी म्हणायची आणि दुसरीकडे…; आशिष शेलारांची टीका

अमित भाईंच्या पायगुणानं महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईल- चंद्रकांत पाटील

“मुंबईत भाजपला मोठा धक्का! राम कदमांच्या समर्थकांचा मनसेत प्रवेश”

“सलग 3 दिवस बॅंका राहणार बंद; पहा कधी ते”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here