नागपूर : प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली असून, त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असं म्हटलं आहे. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
प्रख्यात गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेले विधान निषेधार्थ आहे. अख्तर यांनी अफगाणिस्तान येथे जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावे म्हणजे त्यांना या अतिरेकी संघटनेबद्दल वस्तुस्थिती लक्षात येईल, असं प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिलं.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ही संघटना देशप्रेमाची, सेवाभावाचे संस्कार रुजविणारे विद्यापीठ आहे. समाजातील शेवटच्या घटकाच्या, वंचितांच्या कल्याणासाठी काम करणारी ही संघटना आहे. जावेद अख्तर यांनी हे वादग्रस्त विधान मागे घावे’, अशी मागणी बावनकुळे यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नाही; भाजपच्या ‘या’ आमदाराचा पक्षाला घरचा आहेर
पडळकर हे अज्ञानी बालक, त्यांना त्यांचं मूळच माहीत नाही; विजय वडेट्टीवार यांचा टोला
…तर आता मी देखील करेक्ट कार्यक्रम करणार; राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला इशारा
पंकजाताई, 2024 च्या निवडणुकीत मी तुमच्यासोबत- करूणा मुंडे