मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू व टी-20 स्पेशालिस्ट सुरेश रैना याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या IPL मध्ये त्याने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर रैना IPL न खेळता स्वदेशी परतला होता. त्यानंतर आता सुरेश रैना जातीचा उल्लेख केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
तमिळनाडूमध्ये सुरू असलेल्या TNPL तामिळनाडू प्रीमियर लीगच्या उद्धाटनासाठी सुरेश रैनाला आमंत्रित करण्यात आलं होतं. TNPL चा पहिला सामना सोमवारी खेळवण्यात आला. यावेळी या लाईव्ह सामन्याची काॅमेंट्री करण्यासाठी रैनाला बोलवण्यात आलं.
काॅमेंट्री करत असताना रैनाला त्याच्या सहकाऱ्यांनी काही प्रश्न विचारले. चैन्नईच्या संघात असताना तुला आम्ही लुंगी घालून नाचताना पाहिलंय. तू साऊथइंडियन पद्धत कशी स्विकारली?, असा सवाल सहकाऱ्यांनी त्याला विचारला. यावर रैनाने म्हटलं की, मी सुद्धा एक ब्राम्हण आहे. मला इथली संस्कृती आवडते. अनिरुद्ध श्रीकांत, सुब्रमण्यम बद्रीनाथ, लक्ष्मीपती बालाजी या खेळाडूंसोबत मी खेळलोय, त्यामुळे मला इथल्या गोष्टी आवडतात. त्यामुळे चेन्नईच्या संस्कृतीवर माझं प्रेम आहे. मला सीएसकेकडून खेळायला आवडतं, आणि आणखी मी खेळत राहिल, असंही रैना म्हणाला आहे.
दरम्यान, काॅमेंट्री करत असताना जातीचा उल्लेख केल्याप्रकरणी टी-20 स्पेशालिस्ट सुरेश रैना वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“दिलेला शब्द जागणारे व कामातही ‘दादा’ असणारे अजित दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”
सगळे प्रश्न कोमात, तिन्ही पक्षात स्वबळाची छमछम जोमात; आशिष शेलारांचा घणाघात
…मग आता तोच न्याय स्वतःलाही लावा; भातखळकरांचा संजय राऊतांना खोचक सल्ला!