अखेर मनोज जरांगेनी उपोषण घेतलं मागं; राज्य सरकारला दिली 2 जानेवारीची डेडलाईन

0
152

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जालना | मराठा आरक्षणासंबंधी एक मोठी माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे.

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आम्हाला वेळ मागितला आहे. काही हरकत नाही. थोडा वेळ देऊ. 40 वर्ष दिले अजून थोडा वेळ देऊ. पण आरक्षणाचं आंदोलन थांबणार नाही, असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी तूर्तास उपोषण सोडत असल्याचं स्पष्ट केलं.

ही बातमी पण वाचा : “शमी, सिराज, बुमराहकडून लंकादहन, टीम इंडिया वर्ल्डकपच्या सेमिफायनलमध्ये”

तुम्ही वेळ घ्या. पण आम्हाला आरक्षण द्या, मात्र आता दिलेला हा वेळ शेवटचाच असेल. आम्ही सरकारला 2 जानेवारीपर्यंतची वेळ देत आहोत, असं मनोज जारांगे म्हणाले आहेत.

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास सरकार तयार आहे. तसं आज ठरलंय. त्यांनी हे मान्य केलंय. हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी विशेष सांगतोय. असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, नऊ दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

…तर परिणाम भोगावे लागतील – मनोज जरांगे

‘कुणबी म्हणून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही’ – एकनाथ शिंदे

मोठी बातमी! बीडच्या घटनेत थेट नेत्यांचा हात?; फडणवीसांचा खळबळजनक दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here