मुंबई : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. चिपळूणमध्ये आभाळ ढगफुटीचा प्रत्यय आला. जोरदार पावसाने आणि महापुराने चिपळूणचं खूप नुकसान झालं. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत चिपळूणचे पालकमंत्री अनिल परब यांच्यांवर निशाणा साधला आहे.
आस्मानी संकटामुळं चिपळूणचे नागरिक अन्न-पाण्यावाचून तडफडतायेत एवढचं नाही तर पुरामुळे दवाखान्यातून ॲाक्सिजन पुरवठा रद्द झाल्याने एकाच दिवशी ८ कोविड रूग्ण दगावले अशा वेळेस पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी अनिल परब रात्रीतून मुंबईला पळ काढतात, असा घणाघात चित्रा वाघ यांनी यावेळी केला.
अशा संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले ? हे तर पळकुटे मंत्री..!!, अशी टीका चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर केली.
अशा संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले ? हे तर पळकुटे मंत्री..!! (२/२)@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 24, 2021
महत्वाच्या घडामोडी –
सांगलीकराना मिळणार दिलासा; कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होण्याची शक्यता
महाराष्ट्राच्या स्थितीवर केंद्राचंही लक्ष- देवेंद्र फडणवीस
“राज्यात पूर आलाय तरीही उद्धव ठाकरे घरात, त्यांनी आता घराबाहेर पडावं”