आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : शिवसेनेने ठाणेकरांची फसवणूक केली आहे, असं म्हणत सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते ठाणे महापालिका मुख्यालयापर्यंत जनजागरण मोर्चा काढण्यात येणार आहे, असं मनसे नेते अभिजित पानसे आणि अविनाश जाधव स्पष्ट केले आहे.
शिवसेनेने गेल्या दहा वर्षांत ठाणेकरांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एकही काम केलेले नाही. या सत्ताधारी शिवसेनेने ठाणेकरांची फसवणूक केली आहे, असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
हे ही वाचा : “शरद पवार पंतप्रधान व्हावेत, ही प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा”
ठाणे महापालिकेच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात अनेक लेखी आश्वासने दिली आणि घरोघरी छापील पत्रके वाटली होती. मात्र, कोणतेही आश्वासन पूर्ण न करता ठाणेकरांची फसवणूक केली आहे, असा आरोप अभिजित पानसे आणि अविनाश जाधव यांनी केला आहे.
दरम्यान, आरोग्य कवच योजना, धरण क्षेत्र, 30 एकर जागेत सेंटर पार्क, धरण बांधणी, क्लस्टर योजना, 500 चौरस फूट कर माफ, जलवाहतूक सुविधा, अशा अनेक गोष्टींची आश्वासने शिवसेनेने दिली होती. मात्र, यातील एकही आश्वासन पूर्ण केले नाही, असाही आरोप मनसेने केला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“बिघाडी सरकारला सत्ता हवी, मात्र जनतेच्या प्रश्नांना तोंड देण्याची हिंमत नाही”
2024च्या लोकसभेत भाजपा 418 जागांच्या खाली येणारच नाही; चंद्रकांत पाटलांटा दावा
पुण्यातील मनसेचे डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे यांची राज ठाकरेंबद्दल भावनिक पोस्ट, म्हणाले…