आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : कराडमधून परतल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांचं मुलुंडमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ‘किरीटजी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं…’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणादून सोडला.
मी लढत असलेली एक प्रकारची क्रांती आहे. मी आता शांत बसणार नाही. माझी लढाई घोटाळेबाजांविरोधात आहे. मी यांचे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे सरकारची दादागिरी सुरु आहे. पण ही दादागिरी जास्त दिवस चालणार नाही. पवार आणि ठाकरेंचे मुश्रीफांना वाचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण मी आता थांबणार नाही. भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करावीच लागणार, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
दरम्यान, ठाकरे सरकारने भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र बनविला. कोरोनाकाळात सरकारकडून प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला. रेमडेसिव्हीर, औषधांमध्ये घोटाळे केले. सरकारने मयताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं. कोरोना काळात ठाकरे सरकारने स्व:तचे खिसे भरले, पण आम्ही महाराष्ट्र घोटाळेमुक्त, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करुन दाखवू, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
सध्याची ईडीची अवस्था रस्त्यावर चलन काटणाऱ्याप्रमाणे- सुप्रिया सुळे
“शुभमन गिल-वेंकटेश अय्यरची विस्फोटक खेळी; कोलकाताचा आरसीबीवर एकतर्फी विजय”
फडणवीस सरकारच्या काळातील काही मंत्र्यांच्या फाईल बाहेर येणार- नाना पटोले
चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं गोड स्वप्नं; रूपाली चाकणकरांचा टोला